नवी मुंबई  

नवी मुंबई महापालिकेकडे थॉयराईड, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू तपासणी लॅबही उपलब्ध नाही. चाचणीसाठी काढलेले रक्त तपासणीची यंत्रणाही आपल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. केंद्र व राज्य सरकारकडून सतत पुरस्कार मिळविणार्‍या महापालिका प्रशासनाकडे स्वत:ची या आजारावर लॅब  नसल्याचे दुष्परिणाम कोरोना संसर्गकाळात दिसून हेत आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे पालिका कोरोनाचे निदान होण्याकरिता लॅब बनवत आहे त्यानुसार पालिकेने इतर आजारांच्या निदानासाठी यंत्रणा उभी करावी अशी मागणी माजी नगरसेविका सुनीता मांडवे यांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

नवी मुंबई महापालिकेला आधुनिक शहराचा व पालिकेचा दर्जा प्राप्त झाला आहे. नवनव्या कल्पना व उपक्रम राबवून पालिकेने स्वकर्तृत्व सिद्ध केले आहे. मात्र उत्तम आरोग्य यंत्रणा  उभारणार्‍या पालिकेला आजतागायत स्वतःची लॅब तयार करता आलेली नाही. त्यामुळे थॉयराईड, डेग्यू, स्वाईन फ्ल्यू व सध्या कोरोनासाठी पालिकेला खासगी लॅबवर निर्भर राहावे लागत आहे.सध्या पावसाच्या दिवसात साथीच्या आजारांचा उद्रेक

होण्याची भीती आहे. तर दुसरिकडे कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. रूग्णांची कोरोनाबाबत चाचणी केली तरी त्याचे चाचणी अहवाल येण्यास 7 ते 9 दिवसांचा कालावधी लागतो. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर चांगले, परंतु पॉझिटिव्ह अहवाल आला तर तात्काळ हालचाली करून उपचारासाठी यंत्रणा सतर्क होते. पंरतु यादरम्यान संबंधित पॉझिटिव्ह रूग्ण शेकडो लोकांच्या संपर्कात आलेला असतो.

पालिकेने सध्या स्वतःची लॅब उभारण्यास सुरुवात केली आहे. यात कोरोना विषाणूच नाही तर इतर आजारांच्या देखील चाचण्या केल्या जाव्यात अशी यंत्रणा पालिकेने उभारावी. त्यामुळे शहरातील नागरिकांची खासगी लॅबकडून होणारी लूट थांबेल असे देखील माजी नगरसेविका मांडवे यांनी सुचवले आहे.

 

अवश्य वाचा