मुंबई

 अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वाच्या केंद्रस्थानी असलेली सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू झाला असून शुक्रवारी ईडीने तब्बल साडेआठ तास रियावर प्रश्‍नांचा भडीमार केला. ( र्डीीहरपीं डळपसह ठरर्क्षिीीं र्डीळलळवश उरीश )

  ईडीच्या बेलार्ड पीयर येथील कार्यालयता रिया आणि तिचा भाऊ शौविकची मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. आठ तास चाललेल्या या चौकशीनंतर दोघांनाही रात्री उशिरा सोडण्यात आले. या चौकशीचा तपशील हाती आला नसला तरी रियाकडून तपासात सहकार्य केले जात नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता रियाकडून असहकार कायम राहिल्यास ईडीकडून अटकेची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. आजच्या चौकशीनंतर रियाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन