मुंबई 

  गेल्या काही काळापासून एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्यात आली, तर काही कर्मचार्‍यांचं वेतन रखडलं. कोरोना व्हायरसमुळं उदभवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा फटका एसटी महामंडळालाही बसला. अत्यावश्यक सेवा पुरवूनही एसटीच्या कर्मचार्‍यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण, आता ऐन सणासुदीच्या दिवसांत मात्र हे चित्र बदलताना दिसणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याचे संकेत दिले आहेत.

 मुंबईत एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती देत कर्मचार्‍यांना मोठा दिलासा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीत एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी म्हणून 550 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याचं परब यांनी सांगितलं. 

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही