Wednesday, May 19, 2021 | 02:40 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

दहावी, बारावीच्या परीक्षा मे, जूनमध्ये
मुंबई
12-Apr-2021 08:12 PM

मुंबई

दहावी, बारावीच्या परीक्षा  मे, जूनमध्ये शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

 | मुंबई |  प्रतिनिधी |

कोरोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अखेरीस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची यासंदर्भात महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मेअखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याची तयारी सुरू होती. मात्र, गेल्या दहा दिवसांत कोरोनाचा राज्यात उद्रेक झाला. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमालीची वाढली असून, यात पालक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असे परीक्षा प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

 दहावी आणि बारावी हा जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच अभ्यासाचा तणाव आणि त्यातच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 

 वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

अन्य बोर्डांनाही आवाहन

राज्य सरकारने बोर्ड परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच पद्धतीने सीबीएसई आणि आयसीएसई या अन्य बोर्डांनीदेखील परीक्षा लांबणीवर टाकाव्यात, असे आवाहन केले जाणार आहे, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली.

एप्रिलअखेर होणार होत्या परीक्षा

यापूर्वीच्या नियोजित वेळेनुसार बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिलपासून, तर दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार होती. या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार होत्या. त्यामुळे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कसे पाठवायचे, हा मोठा प्रश्‍न पालकांपुढे होता. त्यातच येत्या आठवड्यात महाराष्ट्रात काही दिवसांचा लॉकडाऊनही पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे या परीक्षांवर अनिश्‍चिततेचे सावट होते. पण, आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी-पालकांची जीव भांड्यात पडला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top