Thursday, January 21, 2021 | 12:36 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई
03-Dec-2020 12:06 PM

मुंबई

खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना हृदयासंबंधी त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्या त्यांच्यावर दुसर्‍यांदा अँजिओप्लास्टी होणार आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मैथ्यू त्यांच्यावर उपचार करणार आहेत. हृदयासंबंधी पुन्हा त्रास होऊ लागल्याने वर्षभरात राऊत यांच्यावर दुसर्‍यांदा अँजिओप्लास्टीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार,  राऊत लीलावती रुग्णालयात अ‍ॅडमिट झाले आहेत. त्यानंतर आज  त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यामध्ये सरकार स्थापनेबाबत गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये बैठक झाली होती, या बैठकीला राऊत हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस असल्याचे निष्पण्ण झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर पहिल्यांदा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला होता.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top