मुंबई 

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. पुरता शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकर्‍याची व्यथा जाणून घेण्यासाठी आणि शेतकर्‍याला आधार देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  मराठवाड्याचा दौरा करणार आहे. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद इथे पवार पाहणी करणार आहेत. उद्यापासून पवार दौर्‍यावर असणार आहेत. ते 18 आणि 19 ऑक्टोबर असा दोन दिवस दौरा करणार आहेत.

 राज्यात कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा प्रमाणात परतीच्या पावसामुळे भातशेती आणि पिके तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.  

  दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच दौरा करणार आहेत. तसेच ते शेतकर्‍यांच्या भेटी देखील घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त