नवी मुंबई 

नवी मुंबई शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे

नागरिक चिंतेत आहेत. त्यात केंद्र शासनाच्या सतत बदलणार्‍या विविध नियमांचव पालिकेला अंमलबजावणी करावी लागत आहे. या नव्या नियमांमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला असून;नागरिकांचे शंका निरसन व्हावे या उद्दिष्टानुसार थेट वैद्यकीय अधिकर्यांनीच नागरिकांचे ऑनलाईन शंकानिरसन केले. स्थानिक माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

सीवूड भागातील नागरिकांना कोरोनाबाबत असलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी झूम ऑनलाइन मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या मीटिंगमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण कटके यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या विविध प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली. काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. पालिका करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच वारंवार बदलणार्‍या नियमांनुसार सद्य स्थितीत काय करावे हे देखील सांगितले.  वैद्यकीय अधिकारी डॉ.कटके यांनी शहरात दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, शासन आणि प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी, अलगीकरण

संदर्भातील नियमावली, आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना, अलगीकरण आदी विषयांवर नागरिकांशी चर्चा करण्यात आली. माजी नगरसेवक डोळस यांनी ऑनलाईन आयोजित केलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करण्यात आले आहे.