Thursday, December 03, 2020 | 01:13 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई
27-Oct-2020 07:39 PM

मुंबई

 मुंबई

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणार्‍या अभिनेत्री पायल घोषणने रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंमध्ये प्रवेश केला होता. या कार्यक्रमाला रामदास आठवले उपस्थित होते. त्यावेळी ते अनेकांच्या संपर्कात आले होते. रामदास आठवले यांना काल कोरोना चाचणी केली होती. आज सकाळी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आला आहे. त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. आठवलेंना काही सौम्य लक्षणं आहेत, असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच रामदास आठवलेंच्या संपर्कातआलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी असंही त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top