Thursday, December 03, 2020 | 01:15 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरेपी
मुंबई
27-Oct-2020 08:07 PM

मुंबई

 मुंबई  

 विरोधी पक्षनेते तसंच बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरेपी सुरू करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर सेंट जॉर्जमध्ये उपचार सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.

 रविवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचा एक डोस देण्यात आला होता. यानंतरही आजही त्यांना आणखी एक डोस देण्यात आल्याचे सांगितले जाते. देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची काळजी घेणं अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.  देवेंद्र फडणवीस यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 वरून 97 पर्यंत वाढली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top