ठाणे जिल्ह्यातील रुग्णवाढ चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे सुविधा तातडीने उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना दिले.

जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयशाचा ठपका ठेवून पालिका आयुक्तांच्या बदल्यांचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेप्रमाणे कार्यपद्धती अमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुन्हा टाळेबंदीची अनुमतीही पालिकांना देण्यात आली. मात्र त्यांनतही करोनावर नियंत्रण मिळविण्याच ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांना यश आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पालिका आयुक्तांशी संवाद साधत कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या वेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता उपस्थित होते.

कोरोनाची वाढ गुणाकाराने होत आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईमध्ये ज्या रीतीने सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा सुविधा ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी करणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सूचना देऊनही पाहिजे तेवढया सुविधा उभारलेल्या दिसत नसल्याद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

अवश्य वाचा