नवी मुंबई  

संचारबंदीच्या काळात ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव वीज देयकाबाबत मनसे  आक्रमक झालेली आहे. वाढीव वीज देयकांबाबत मनसेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी शुक्रवार, दिनांक 3 जुलै 2020 रोजी  महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आण्णासाहेब काळे यांना  पत्र दिले. महावितरणच्या कार्यालयात वाढीव वीज देयकाची होळी करण्याचा इशारा  शेटे यांनी यावेळी दिला.

सध्या संचारबंदीच्या काळात सानपाडा विभागातील अनेक नागरिक हे गावी गेले आहेत. त्यांच्या घरातील वीज पूर्णपणे बंद आहे. तर काही नागरिक हे नुकतेच कामानिमित्त गावावरून मुंबईला परत येऊ लागले आहेत. असे असतानाही सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पटीने ग्राहकांना महावितरण कंपनीकडून वाढीव वीज देयके पाठविण्यात आलेली असून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप  शेटे यांनी केला. याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठया प्रमाणात ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने ग्राहकांना सुधारित वीज देयकात 50 टक्के सवलत दयावी, ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी पुरेसा वेळ दयावा, कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांची मीटर लाईन / वीज पुरवठा खंडीत करू नये, ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निवारण करावे अशी मागणी  शेटे यांनी लेखी पत्राद्वारे महावितरणकडे केली.

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन