मुंबई

निसर्ग चक्रीवादळाने रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली असून हे वादळ वेगाने मुंबईच्या दिशेने सरकत आहे. हे वादळ अलिबाग किनारी दुपारी एक ते चार वाजेदरम्यान कधीही धडकण्याचा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे.

निसर्ग चक्रीवादळाचे रौद्र रूप दाखवणारे सॅटेलाइट दृष्य हवामान विभागाने जारी केले असून हे वादळ पुढील काही तासांत ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने रायगड जिल्ह्यात समुद्र किनारी धडकण्याची शक्यता आहे. भूपृष्ठावर शिरकाव केल्यानंतर हे वादळ हाहाकार माजवण्याची भीती असून मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह पुणे आणि नाशिक विभागातही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी 1 ते 4 वाजे पर्यत  कोणत्याही क्षणी किनारपट्टीवर धडकू शकते असे हवामान विभागाने सांगितले आहे.वादळ जसजसं कोकण किनारपट्टीकडे सरकत आहे तसतसा वार्‍याचा वेगही वाढत चालला आहे. सकाळी 8.30 वाजताच्या नोंदीनुसार रत्नागिरीत 55 किमी वेगाने वारे वाहत होते. त्याचवेळी कोकण किनारपट्टीवर वार्‍यांचा वेग ताशी 55 ते 65 किमी इतका होता. दुपारी हा वेग आणखी वाढून 100 ते 110 किमी पर्यंत जाईल. प्रत्यक्षात वादळ किनारी धडकेल तेव्हा वार्‍याचा वेग ताशी 120 किमी च्या आसपास असेल, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ