नवी मुंबई  

नवी मुंबईत 292 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर 342 जणांचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह आला. त्यामुळे  नवी मुंबईने बधितांची संख्या 31 हजार 005 तर  बरे झालेल्यांची 26 हजार 777  झाली आहे.

 नवी मुंबईचा रिकव्हरी रेट  86 टक्क्यांवर स्थिरावला आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत 3 हजार 563 रुग्ण उपचार घेत आहेत.  एका दिवसात 04 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 665 झाली आहे.  दिवसभरात नवी मुंबईच्या आठही विभागांत मिळून 1 हजार 574 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, एकूण  रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या 98 हजार 213 झाली आहे. एकूण आर.टी.पी. सी.आर टेस्ट केलेल्यांची संख्या  63 हजार 692 झाली असून कोविड टेस्ट केलेल्यांची एकूण संख्या 1 लाख 61 हजार 905 झाली आहे.  नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 49 , नेरुळ 57, वाशी 77, तुर्भे 53, कोपरखैरणे 33, घणसोली 33, ऐरोली 36, दिघा 04 इतके रुग्ण आढळले.

 

अवश्य वाचा