नवी मुंबई

नवी मुंबईत 327 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर  243 जणांचा  कोरोना अहवाल पोजिटिव्ह आला. त्यामुळे  नवी मुंबईत बधितांची संख्या 41 हजार 973 तर  बरे झालेल्यांची 38 हजार 164 झाली आहे. 

 नवी मुंबईचा रिकव्हरी रेट  वाढून 91 टक्के झाला आहे.  ही समाधानाची बाब असून नवी मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल असल्याचे बोलले जात आहे.  सद्य स्थितीत नवी मुंबईत 2 हजार 963 रुग्ण उपचार घेत आहेत.  दिवसभरात 05 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 846 झाली आहे. नवी मुंबईच्या आठही विभागांत मिळून दिवसभरात  1 हजार 492 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून,  एकूण रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या 1 लाख 56 हजार 509 झाली आहे. एकूण आर.टी.पी. सी.आर टेस्ट केलेल्यांची संख्या  90 हजार 179 झाली आहे. कोविड चाचण्यांची एकूण संख्या  2 लाख 46 हजार 688 इतकी झाली आहे.  नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 43, नेरुळ 31, वाशी 27, तुर्भे 24 कोपरखैरणे 39, घणसोली 25, ऐरोली 50, दिघा 04 इतके रुग्ण आढळले.