मुंबई  

 एसटीच्या कोरोनाबाधित कर्मचार्‍यांचा आकडा वाढत असल्याने अखेर एसटी महामंडळाने कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचार्‍यांवर योग्य वेळी उपचार व्हावे यासाठी मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रामगृहात करोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिके शी चर्चा करूनच अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

कामगारांची वाहतूक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी एसटी सेवा दिल्यानंतरही एप्रिल, मे महिन्यापर्यंत एसटीचा एकही कर्मचारी कोरोनाबाधित नव्हता. मात्र जून महिन्याच्या 15 तारखेनंतर कोरोनाबाधित कर्मचारी आढळून येऊ लागले. सध्याच्या घडीला राज्यात एसटीचे 277 कोरोनाबाधित कर्मचारी असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 117 कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले, तर 154 कर्मचार्‍यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई सेन्ट्रल, कु र्ला नेहरूनगर, परळ, पनवेल, उरण आगारात मिळून 97 आणि  ठाणे विभागाच्या खोपट, वंदना चित्रपटगृह, कल्याण, भिवंडी, शहापूर आगारांत 113 कर्मचारी आहेत. दररोज सरासरी दोन ते चार कोरोनबाधित एसटी कर्मचार्‍यांची भर पडत आहे.

कोरोनाच्या धास्तीने एसटीचे अनेक कर्मचारी गावी निघून गेले. म्हणून मुंबईतच करोना सेंटर उभारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यासाठी पालिके ची मंजुरी आवश्यक असून करोना सेंटरही त्यांच्याच देखरेखीखाली उभारले जाईल. हे सेंटर एसटीच्या मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात (रेस्ट रूम) करण्याचा विचार आहे. सध्या येथे दोन विश्रांतीगृह असून एक आगारातील चालक-वाहकांसाठी आणि दुसरा राज्याच्या कानाकोपर्‍यातून एसटी बस घेऊन येणार्‍या चालक-वाहकांसाठी आहे.

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....