राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये आढळणार्‍या करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. शिवाय, कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. आज दिवसभरात मुंबईत करोनामुळे 49 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 1 हजार 585 नवे कोरोनाबाधित आढळले.मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या  1 लाख 73 हजार 534 वर पोहचली आहे. यामध्ये 30 हजार 879 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले 1 लाख 34 हजार 66 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 8 हजार 227 जणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.

 

अवश्य वाचा