Monday, March 08, 2021 | 08:15 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

वीज ग्राहकांना महावितरणचा ‘शॉक’
मुंबई
20-Jan-2021 08:49 PM

मुंबई

मुंबई, प्रतिनिधी

वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास बुधवारी दिले आहेत. ही थकबाकी लॉकडाऊन काळातील असून, या आदेशाने ग्राहकांना मोठा झटका बसणार हे स्पष्टच दिसत आहे.

डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून, यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. डिसेंबरअखेर राज्यातील कृषीपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मुळे लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊन काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबरअखेरपर्यंत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने आधीच दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णयही महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. परंतु, आता थकबाकीचा डोंगर वाढत चालल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला अशक्य होत चाललं आहे. बँकांची व इतर देणी तसेच कर्मचार्‍यांचा पगार देणेही शक्य नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच टोकाचे पाऊल उचलले गेले आहे.

ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करावी लागते व त्यासाठी वीज पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. त्यामुळेच थकबाकी वसुली गरजेची झाली आहे. म्हणून थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकार्‍यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत. थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले गेले आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top