Monday, March 08, 2021 | 09:05 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मोदी सरकार भांडवलदारांचा गुलाम : बाळासाहेब थोरात
मुंबई
25-Jan-2021 07:57 PM

मुंबई

। मुंबई । प्रतिनिधी ।

मोदी सरकारने लादलेल्या कायद्याविराधात दिल्लीमध्ये अद्भुतपूर्व आंदोलन सुरु आहे.हे इतिहास घडविणारे आंदोलन आहे. या कायद्याबाबत खासदारांनी चर्चा करण्याची मागणी केली असता त्यांना निलंबित करून कायदे मंजूर केले. आंदोलन रोखण्यासाठी अनेक मार्ग मोदी सरकारने अवलंबले. पण, त्यावर मात करत नव्या उमेदीने आंदोलन केले आहे. भांडवलदार, साठेबाजार, नफेखोरांच्या फायद्यासाठी कायदा करण्याचा घाट घातला आहे. बाजार समित्या रद्द करणे, स्वस्त धान्य दुकान बंद करून शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. सात बारा विकण्याचे काम सुरू आहे. मोदी सरकार भांडवलदारांचे गुलाम असून, हा शेतकर्‍यांचा एल्गार नवी दिशा व ताकद देणारा आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top