Wednesday, May 19, 2021 | 02:23 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन?
मुंबई
12-Apr-2021 08:18 PM

मुंबई

 

 | मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतची घोषणा करतील, अशी माहिती टाक्स फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन लावण्यासंदर्भात टाक्स फोर्सने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सूचित केले.

राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होत असून, या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, लोकांचे जे काही प्रश्‍न असतील, ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा, या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. राजेश टोपे यांनी पुढे सांगितले की, या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे. पण, राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टास्क फोर्सच्या सदस्यांचे मत होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top