नवी मुंबई  

नवी मुंबई महापालिकेने कोरोना महामारीत नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली होती. त्यानुसार आजतागायत नवी मुंबईत 7 लाख 92 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन अशांवर ही कारवाई करण्यात आली.

 महापालिका आयुक्त श अण्णासाहेब मिसाळ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आपल्या वर्तनाने अडथळे आणणार्‍या नागरिकांकडून दंडात्मक वसूली करण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोनाचा वाढती संख्या पाहता या दंडात्मक कारवाईत वाढ करण्याची गरज आहे.

यात बेलापूर विभाग कार्यालयाने 2 लक्ष 19 हजार, नेरुळ विभाग कार्यालयाने  39 हजार, वाशी विभाग कार्यालयाने 56 हजार 500, तुर्भे विभाग कार्यालयाने 2 लक्ष 2 हजार 250, कोपरखैरणे विभाग कार्यालयाने 93 हजार 400, घणसोली विभाग कार्यालयाने 31 हजार 400, ऐरोली विभाग कार्यालयाने 1 लक्ष 38 हजार 900 व दिघा विभाग कार्यालयाने 12 हजार 300 अशा प्रकारे आठही विभाग कार्यालयांमार्फत एकूण 7 लक्ष 92 हजार 750 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. यात नागरिकांना सामाजिक अंतर न राखल्यास 200, थुंकणार्‍यास 1 हजार रुपये तर  मास्क न वापरणार्‍यास 500  रुपये तर दुकानदारांना 2 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

 

अवश्य वाचा