Tuesday, April 13, 2021 | 12:59 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

लस पुरवठ्यावरुन कलगीतुरा
मुंबई
07-Apr-2021 06:06 PM

मुंबई

 

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज्यात कोरोनाचे संकट गहिरे  होत असतानाच आता लसींचाही  तुटवडा  जाणवू लागलायं.यावरुन राज्य आणि केंद्र सरकारमध्ये कलगीतुरा रंगलाय.सध्या  राज्याकडे  तीन  दिवस पुरेल एवढ्याच लसी उपलब्ध असल्याने केंद्राने राज्याला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करावा, अशी मागमी आरोग्य मंत्री राजेश टोेपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत  राजेश टोपे  यांनी लसीकरण, ऑक्सिजन  तसंच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली.

प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं.आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून  लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडेचार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचार्‍यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे, अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

देशात पुरेसा लसी -हर्षवर्धन

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. केंद्र सरकार सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचंही ते म्हणाले आहेत. हर्षवर्धन यांनी यावेळी देशात परिस्थिती नियंत्रणात असून अनेक त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी त्यांनी बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचं कारण असल्याचं अधोरेखित केलं. हर्षवर्धन यांनी यावेळी करोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशाचा रिकव्हरी रेट 92.38 असून मृत्यूदर 1.30 टक्के असल्याची माहिती दिली

 लसीकरणातही सापत्नपणा

गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रच्या जवळपास निम्मी आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्याही देशात सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पाठोपाठ सर्वाधिक डोस गुजरातला देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत 77 लाख, राजस्थान 74 लाख, उत्तर प्रदेश 73 लाख, पश्‍चिम बंगाल 66 लाख, कर्नाटक 49 लाख, मध्य प्रदेश 45 लाख, केरळ 40 लाख डोस असे काही प्रमुख राज्यातील प्रमाण आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक 82 लाख लसींचे डोस देण्यात आले आहे. मात्र, लोकसंख्या आणि कोरोना संक्रमित रुग्णसंख्येची तुलना केल्यास त्या प्रमाणात महाराष्ट्राला लसींचा पुरवठा होत नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

रुग्णवाढीचा विश्‍वविक्रम

 कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात सर्व विक्रम मोडलेले आहेत. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल 1 लाख 15 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.  630 रुग्णांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. तर, 59 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top