बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केलं आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे यांनी रविवारी हा आरोप केला. विनय तिवारी मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास करण्यासाठी हे पथक मुंबईत आले आहे.

बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री 11 वाजता मुंबई महापालिका अधिकार्‍यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केलं असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे यांनी ट्विट केले आहे. विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

24 जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्रयातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मागच्या महिन्यात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला व तक्रारीत रेहा चक्रवर्तीचे नाव घेतले. मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींसह 40 जणांची या प्रकरणी चौकश करण्यात आली आहे

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद