मुंबई 

आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे नाही संयुक्त सचिव जनार्धन संगम यांचे वयाच्या 68 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाली. त्यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु नंतर खेळापेक्षा संघटनेत काम करण्यास त्यांनी अधिक पसंती दिली. अनेक राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी कधी पंच व प्रमुख पंच म्हणून तर कधी तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले होते. सन  1992 ते 2019 जवळपास 27 वर्षे ते महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव म्हणून काम करत होते. त्यापेक्षाही वृत्तपत्राद्वारे व क्रीडा वाहिन्यांद्वारे खेळाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.  

 

अवश्य वाचा