Monday, March 08, 2021 | 07:51 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

हमीभाव कायदा लागू करा : आ. जयंत पाटील
मुंबई
25-Jan-2021 07:45 PM

मुंबई

। मुंबई । प्रतिनिधी ।

केंद्र सरकारने लादलेल्या कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून देशभर आंदोलन सुरु आहे. पंजाबच्या शेतकर्‍यांनी ताठर भूमिका ठेवून मोदी सरकारविरोधात लढा उभारला आहे. आजच्या मोर्चात रायगडसह अन्य जिल्ह्यांतील शेतकरी सामील झाले आहेत. नाशिकमधील शेतकरीदेखील या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या सर्व शेतकर्‍यांना लाल सलाम. ज्याप्रमाणे उसाला हमी भाव आहे. त्याप्रमाणे प्रत्येक शेती उत्पादन मालावर हमीभावाचा कायदा लागू झाला पाहिजे. उत्पादन किंमतीपेक्षा कमी दरात खरेदी केले तर गुन्हा दाखल केला पाहिजे. आदिवासी समाजाची जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी दोन वर्षांपूर्वी याचठिकाणी आंदोलन केले होते. त्यावेळी फडणवीस सरकारने आश्‍वासित केले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. आघाडी सरकारने ही मागणी पूर्ण करावी, अशी विनंती शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केली.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top