Tuesday, April 13, 2021 | 01:55 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

परमबीर यांच्य त्या पत्राबाबतच साशंकता
मुंबई
07-Apr-2021 06:22 PM

मुंबई

 

 । मुंबई  । प्रतिनिधी ।

परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबतच आता साशंकता व्यक्त केली जात आहे.त्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचा कबुली जबाब सीबीआयने नोंदवून घेतला.त्यात या दोन्ही अधिकार्‍यांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात परमबीर यांच्यात पत्रातील माहिती यामध्ये कमालीचा फरक असल्याचे निष्पन्न होत आहे.पत्रात उल्लेख असलेले संजय पाटील यांच्या चॅटचा मजकूर आणि प्रत्यक्ष दिलेल्या जबाबात तफावत असल्याचे आढळले. मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येक 3 लाख रुपये जमा करण्यास गृहमंत्र्यांनी वाझेला सांगितल्याच चॅटमध्ये उल्लेख आहे. पण प्रत्यक्ष जबाबात गृहमंत्र्यांनी स्वतःहून वाझेंना त्याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख आहे. 

 वाझेने आपल्याला सांगितले की, मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्यक्ष 3 लाख रुपये जमा होत असल्याची माहिती आपल्याला मिळाल्याची विचारणा गृहमंत्र्यांनी वाझेकडे केली असा जबाबात उल्लेख आहे.   म्हणजे गृहमंत्र्यांनी वाझेला पैसे जमा करण्यास सांगितले नव्हते. तर गृहमंत्र्यांनीच असा प्रकार मुंबईत सुरू आहे का ? अशी वाझेकडे विचारणा केल्याचे पाटील यांच्या जबाबात उघड झाले आहे.भुजबळ आणि पाटील 4 मार्च 2021 रोजी अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्‍वर बंगल्यावर त्यांना भेटले असल्याचा परमबीर सिंग यांच्या पत्रात उल्लेख आहे.  मात्र या तिघांची एकत्र बैठक झाली नसल्याचा या दोन्ही अधिकार्यांच्या जबाबात म्हटले.  4 मार्च रोजी आपण अधिवेशनाच्या ब्रिफींगसाठी गृहमंत्र्यांना ज्ञानेश्‍वरीवर भेटलो. तेव्हा संजय पाटील तिथे नव्हते. मी बाहेर पडताना दारात मला संजय पाटील भेटल्याचा भुजबळ यांच्या जबाबात म्हटलंय. 

वाझेचीही चौकशी होणार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्याप्रकरणी अटक असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत वाढ करण्यात आली. कोर्टाने 9 एप्रिलपर्यंत कोठडी वाढवली आहे. यावेळी कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली. चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे.

शरद पवारांवरच वाझेचा आरोप

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी राज्याला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top