Thursday, January 21, 2021 | 01:29 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

अन्यायकारक कृषी विधेयके राज्यात लागू करु नका आ. जयंत पाटील..
मुंबई
04-Dec-2020 08:37 PM

मुंबई

मुंबई,

मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन शेती आणि चार कामगार विरोधी विधेयके संसदीय संकेतांची पायमल्ली करून बळजबरीने पारीत केले आहेत. त्याला देशभरातील शेतकरी आणि कामगार कडाडून विरोध करीत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ही विधेयके राज्यात लागू करु नये, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत आमदारजयंत पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

विधानभवन परिसरात पत्रकारांशी याबाबत बोलताना आ. जयंत पाटील यांनी म्हणाले की, दिल्लीलगतच्या राज्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने या विधेयकांच्या विरोधात दिल्लीच्या मुख्य रस्त्यांवर उतरून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. राज्यातील शेतकर्‍यांचीही या विधेयकांबाबत तीच विरोधाची भूमिका आहे. त्यामुळे दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकर्‍यांना महाराष्ट्र सरकारने समर्थन दिले पाहिजे आणि सदरचे विधेयके राज्यात लागू करण्यात येऊ नये यासाठी येत्या अधिवेशनात सरकारने ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकरी कामगार पक्षाच्या या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असून, राज्यातील शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारतर्फे नक्कीच काळजी घेतली जाईल, असे आश्‍वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आ. जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top