मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणप्रश्‍नी बुधवारी रात्री साडेआठ वाजता चर्चा होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवडयात स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे. मराठा समाजातील नाराजी वाढत असून अकरावी, पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत.

त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे हे फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. फडणवीस गेले चार-पाच दिवस बिहार दौर्‍यावर असल्याने ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरूनही संभाषण केले आहे.

अवश्य वाचा