नवी मुंबई

  नवी मुंबई शहरात मागील 5 दिवसात 1 हजार 249 नागरीकांना कोरोनाची लागण झाली आहे.  दर दिवशी 200 ते 300 तर कधीकधी त्यापेक्षा जास्त कोरोना रूग्णांची भर पडत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात  शहरात कठीण परिस्थिती निर्माण होईल. कोरोना बाधितांवर आरोग्य उपचार करणे कठीण होईल. संपुर्ण शहरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी

तोडण्याकरीता किमान 15 दिवस कडक कर्फ्यू लावून त्याची

शासनाकडूनकडक अंमलबजावणी करावी. आवश्यकता भासल्यास केंद्राची अतिरिक्त राखीव दल किंवा पॅरामिलिटरी फोर्स मागवावी अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी आयुक्तांकडे निवेदन देऊन केली आहे

 

अवश्य वाचा

बदनामी प्रकरणी आठ आरोपींवर

उरण तालुक्यात वीज पुरवठा....