मुंबई 

  देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 53 हजार 601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 22 लाख 68 हजार 676 वर पोहचली आहे. भारत आता कोरोना मृतांच्या यादीत जगात तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसर्‍या स्थानावर घेऊन गेली आहे

 देशातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 22 लाख 68 हजार 676 इतकी झाली आहे. त्यापैकी 6 लाख 39 हजार 929 रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 15 लाख 83 हजार 490  रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 45 हजार 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार देशात ऍक्टीव्ह कोरोना 28.21 टक्के आहे. तर या  धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणार्‍या रुग्णांचे प्रमाण 69.80 टक्के असून  मृत्यू झालेल्यांचे प्रमाण 1.99 टक्के आहे.

 

 

अवश्य वाचा