नवी मुंबई 

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक पोलिसांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 20 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती प्रशासन विभागाचे पोलीस उपायुक्त   सुरेश मेंगडे यांनी दिली आहे

काही दिवसांपूर्वी एपीएमसी पोलीस ठाण्यातील 3 कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका आरोपीमुळे 3 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. तसेच सर्वाधिक पोलिसांना बंदोबस्तामुळे कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. बंदोबस्तमध्ये असणारे पोलीस कर्मचारी लोकांच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत 20 पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहरातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचार्‍यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 20 कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!