मुंबई

राज्यात कोरोना संकट गडद होत असताना महाराष्ट्र पोलिस दलातही करोनानं थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासांत 67 पोलिस कर्मचार्‍यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आत्तापर्यंत एकूण करोनाग्रस्त पोलिस कर्माचार्‍यांची संख्या 1 हजार 097 झाली असून 59 जणांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या पोलिसांमध्ये 122 अधिकारी असून आत्तापर्यंत 3 अधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे. यामुळं सरकारनं पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळं मृत्यू झालेल्या पोलिसांच्या परिवाराला सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसंच. पोलिसांच्या कुटुंबीयांना संबंधित पोलिस अधिकारी किंवा कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी निवासस्थानात वास्तव्य करता येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील 37 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 38, पुणे 3, सोलापूर शहर 3, नाशिक ग्रामीण 3, ए.टी.एस. 1, मुंबई रेल्वे 2, ठाणे 2 पोलीस व ठाणे ग्रामीण 1अधिकारी 2, जळगाव ग्रामीण 1,पालघर 1, जालना पोलीस अधिकारी 1, उस्मानाबाद 1 अशा 59 पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांना करोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या 128 पोलीस अधिकारी व 975 पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

अवश्य वाचा