मुंबई

 मान्सूनच्या आगमनानंतरही बराच काळ लांबलेल्या पावसानं आज अखेर मुंबई व उपनगरात हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून रिमझिमणार्‍या पावसाचा जोर सकाळपासून भलताच वाढला आहे. मुंबई शहरासह पश्‍चिम व पूर्व उपनगरांत गेल्या काही तासांपासून पाऊस कोसळत असून त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. निसर्ग वादळामुळे जूनच्या पहिल्या दिवशी बरसलेल्या पावसानं तब्बल महिनाभरानंतर मुंबईत हजेरी लावली आहे. या पहिल्याच पावसामुळं मुंबई शहर व उपनगरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे.

 

अवश्य वाचा