नवी मुंबई  

महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांनी  वीजजोडणीच्या मीटरचे स्वतः रिडींग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल पद्वारे अपलोड करावेत, असे आवाहन वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता  राजाराम माने यांनी  केले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दि. 1 जुलै पासून कंटेनमेन्ट झोन वगळता सर्व ग्राहकांचे मीटर रिडींग घेण्यात येत आहे. तरी, कंटेनमेन्ट झोन सोबतच इतर ग्राहकांनी स्वतः रिडींग पाठवल्यास संबंधीत वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींग असल्याची खात्री करता येते म्हणून शक्य असल्यास ग्राहकांनी स्वतःचे मीटर रिडींग पाठवावे.

महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावे असे एसएमएस  मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना वारंवार पाठविण्यात येत आहे. वीजग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन पाठविल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार वीजबिल देणे शक्य होणार आहे. तसेच जर  कंटेनमेंट झोन मधील ग्राहक स्वत:चे मीटर रीडिंग पाठविणार नाही, त्यांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येईल असे देखील महवीतरणने सांगितले आहे.

 

अवश्य वाचा