नवी मुंबई  

 नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबधितांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे पालिकेने 10 दिवसांचा लोकडाऊन सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या आयसीएमआरच्या नियमांनुसार अति सौम्य, सौम्य, मध्यम व तीव्र अशी बाधितांची वर्गवारी केली जाते. त्यानुसार पालिकेने अहवाल दिल्यास नागरिकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण नाहीसे होण्यास मदत होईल तर दुसरीकडे भीतीने पालिकेच्या रुग्णालयात धाव घेणार्‍या नागरिकांचा पालिकेवरील ताण देखील काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

शहरातील प्रत्येक नागरिकास बेड उपलब्ध व्हायला हवेत. कोरोनाव्यतिरिक्त आजारांवरही योग्य व वेळेत उपचार होणे गरजेचे असल्याचे  निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व रुग्णालयांना दिले आहेत.  रुग्णालयात उपचारासाठी किती बेड उपलब्ध आहेत, याचा प्रत्येक दिवशी अहवाल देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र सध्या शहरात विरोधाभासचे चित्र निर्माण झाले आहे. बेड उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी पालिका जनजागृती करत आहे. त्यासाठी हेल्पलाईन नंबर देण्यात आले आडून त्याद्वारे नागरिकांचे कौंसलिंग करण्यात येत आहे. अनेक रुग्ण स्वतःला कोरोना झाला या बातमीने भयभीत होऊन त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे अनेक बरे होणार असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. याबाबत महापालिकेने पाऊले उचलण्याची गरज आहे. सध्या पालिकेकडे मुबलक मनुष्यबळ नसल्याने गेले रिण महिने सतत तणात वावरणारी आरोग्य यंत्रणा  थकली आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेसमोर कसलाही पर्याय उरलेला नाही. यासाठी पालिकेला नागरिकांची साथ लागणार आहे. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ वारंवार नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन करत आहेत. मात्र नागरिकांच्या मनात पालिकेकडे बेड उपलब्ध नसणे, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा आशा बातम्या ऐकून नागरिक संभ्रमात आहेत. सध्या पालिका जी रुग्णांची संख्या जाहीर करत आहे. त्यात सौम्य, मध्यम व तीव्र अशी विभागणी केली गेली आहे. अति सौम्य लक्षणे असलेल्यांना होम कोरंटाईन केले जात आहे. सौम्य लक्षणे असलेल्यांना  कोव्हीड केअर सेंटर येथे तर

मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येते. यात ऑक्सिजनची देखील व्यवस्था केली जाते. तर तीव्र लक्षणे असलेल्या व्यक्तींवर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात त्यासाठी आयसीयू विभाग कार्यरत असतो. मात्र सध्या अनेक खासगी रुग्णालयांत मुंबई, ठाणे व पनवेलचे देखील रुग्ण असल्याने नवी मुंबईकरांना जागा मिळेनासी झाली आहे. सध्या आयसीएमआरच्या निर्देशानुसार पालिका कामकाज करत आहे. त्यानुसार महापालिकेने दररोज संख्या जाहीर करताना सौम्य, मध्यम व तीव्र रुग्णांची विभागणी करत आकडेवारी जाहीर केल्यास नागरिकांमधला संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. त्यासोबत पालिका, खासगी रुग्णालये व पालिकेने आरक्षित केलेला कोट्यात आयसीयू बेड व व्हेंटिलेटर्सची दररोज नागरिकांना माहिती उपलब्ध दिल्यास नागरिक चिंतामुक्त होऊ शकतात.

अवश्य वाचा