Thursday, January 21, 2021 | 12:39 AM

संपादकीय

‘बर्ड फ्लू’चा वाढता धोका

संकटं एकटी-दुकटी न येता चोहीकडून येतात आणि घेरुन टाकतात

राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेबाबत संभ्रम
मुंबई
03-Dec-2020 12:36 PM

मुंबई

महाराष्ट्रासाठी कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेचा धोका अद्याप टळलेला नसून कोरोनाचे आकडे दररोज नवे रंग दाखवत असल्याने संभ्रमाची स्थिती कायम आहे. आज नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा कमी झाला असून तूर्त खबरदारी घेणेच शहाणपणाचे ठरेल, हा संदेश यातून मिळत आहे.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेताना दिसत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ही लढाई सुरू आहे. त्यातून राज्यात कोरोनाचा उद्रेक थांबवण्यात यश मिळाले असले तरी कोरोनावर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. कोरोनावरील लस आल्यानंतरच हे संपूर्ण नियंत्रण शक्य होणार आहे. तोवर उपलब्ध उपचारपद्धती व शासनाने घालून दिलेले नियम यांचा आधार घेतच कोरोनापासून बचाव करावा लागणार आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास कोरोनाचे आकडे सातत्याने वेगवेगळे रंग दाखवत आहेत. दिवाळी संपल्यानंतर कोरोनाचे आकडे वेगाने वाढताना दिसत होते. त्यात गेल्या काही दिवसांपासून घट पाहायला मिळाली. त्यानंतर आज पुन्हा एकदा दैनंदिन बाधित रुग्णांचा आकडा वाढल्याचे दिसत आहे. त्याचवेळी मृतांची संख्याही वाढली आहे.

राज्यात आज 111 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 47 हजार 357 इतका झाला आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या 2.58 टक्के इतका आहे. आज राज्यात 5 हजार 600 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर 5 हजार 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 16 लाख 95 हजार 208 कोरोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.52 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 9 लाख 89 हजार 496 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 32 हजार 176 (16.67 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 47 हजार 791 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 6 हजार 73 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top