जागतिक आरोग्य संघटनेकडून करोनाला रोखण्यासाठी प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या धारावी मॉडेलची दखल घेण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. धारावीसारख्या परिसरात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. तर क्टीव्ह केसेसची संख्या केवळ 166 आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतुक करतांना करोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश आहे. धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही करोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी आहे, असंही ते म्हणाले

अवश्य वाचा