Saturday, December 05, 2020 | 11:13 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

ज्वेल ऑफ नवी मुंबईत स्वछता मोहीम
मुंबई
22-Nov-2020 07:21 PM

मुंबई

नवी मुंबई 

 नवी मुंबई महानगर पालिका स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत नवी मुंबई महानगर पालिका , इनव्हरमेन्ट लाईफ संस्था  , रॉबिन हूड आर्मी संस्था यांच्या संयुक्त अभियानाने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसर येथे रविवार दि. 22 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  यावेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

 यावेळी अनेक गोणी कचरा गोळा करण्यात आला. ज्वेल ऑफ नवी मुंबई हे शहरातील सर्वात प्रसिद्ध उद्यान असल्याने त्या ठिकाणी अनेक नागरिक येत असतात. पालिकेने  स्वच्छ सर्वेक्षणात यंदा देशात अव्वल क्रमांक प्राप्त करण्याचे ध्येय ठरवले आहे. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या 2. 7 की. मी पसरलेल्या पट्ट्यात ही मोहीम राबविण्यात आली.  येथे व्यायामासाठी नागरिकांची थेट स्वच्छतेच्या कृतीतून जनजागृती करण्यात आली. पालिकेकडून होत असलेले हे कार्य पाहून यावेळी अनेक  नागरिकांनी देखील स्वतःहून या मोहिमेत सहभाग नोंदवला. येत्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये नवी मुंबई प्रथम क्रमांक येण्यासाठी नागरिकांना आव्हान करण्यात आले , स्वच्छतेची व कोरोना आजार संबंधी शपथ घेण्यात आली.

याप्रसंगी नवी मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा विभागाचे उप आयुक्त  डॉ. बाबासाहेब राजळे  , विभाग अधिकारी तथा सहा आयुक्त  शशिकांत तांडेल , शहराचे मुख्य स्वच्छता आधिकारी राजेंद्र सोनावणे, स्वच्छता निरीक्षक , उप स्वच्छता निरीक्षक , संस्थाचे सदस्य , नवी मुंबईकर नागरिक ,ठेकेदार , साफसफाई कामगार उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top