Saturday, December 05, 2020 | 10:30 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

नवी मुंबईत मराठा मोर्चाच्या चौक सभा व रॅली संपन्न
मुंबई
22-Nov-2020 06:17 PM

मुंबई

नवी मुंबई

युती सरकारच्या काळात मराठा समाजाला  मिळालेले आरक्षण सुप्रीम कोर्टात न टाकल्याने रद्द झाले आहे. याची झळ मराठा समाजातील तरुणांना बसणार आहे. विद्यमान मविआ सरकारला हे आरक्षण टिकवता न आल्याने मराठा समाज नाराज झाला असून, सरकारच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे. त्यानुसार  मुंबई, पालघरनंतर नवी मुंबईत रविवार दि.२२ रोजी मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबईच्यावतीने ठिकठिकाणी चौक सभा व रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात अप व जनजागृती करण्यात आली.

मविआच्या सरकरच्या विरोधात तीव्र नाराजी मराठा समाजाकडून व्यक्त होत आहे.  मराठा समाज नाराज झाला आहे. त्यानुसार राज्यभर चौक सभा ब रॅली काढण्यात येत आहेत. मुंबई, पालघरपासून याची सुरुवात झाली आहे. त्यानुसार  नवी मुंबईत वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवार स.१० वा. रविवार( आज) चौक सभेपासून या जनजागृतीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, कळवा, नेरुळ येथे चौकसभा व रॅली काढण्यात आल्या. सध्या कोरोनाचा संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वाढू लागली आहे. ही सावध भूमिका घेत सुरक्षिततेचे नियम पाळत चौक सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी

मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक अंकुश कदम, बाळासाहेब शिंदे, विनोद पार्टे, ऍड. राहुल पवार, अरुण पवार, जिल्हा समनव्ययक विनोद साबळे, विरेन्द्र पवार, दिलीप जगताप, गणेश गायकवाड व मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top