Wednesday, May 19, 2021 | 12:49 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सावधान, 11 मे पर्यंत कोरोनाची महालाट
मुंबई
03-May-2021 07:27 PM

मुंबई

 

| मुंबई | प्रतिनिधी |

 राज्यात कोरोना संसर्गाचा विळखा 11 मे पर्यंत अधिक वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवलीय. दुसरी लाट ही 11 मे पर्यंत पीकवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर, नाशिक, पुणे, चंद्रपूर, ठाणे या जिल्ह्यात अधिक धोका असल्याचं समोर आले आहे. 

  राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात स्थिरावली आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळते. त्यात 11 मे पर्यंत दुसरी लाट पीकवर जाण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवलीय. राज्यातील रुग्णसंख्येत वाढ सुरू राहिली तर 11 मे पर्यंत अनेक जिल्ह्यांची परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.

 राज्यातील फक्त 7 जिल्ह्यांमध्ये पुरेसे आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये  मुंबई,  सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अमरावती या ठिकाणी नाही पेक्षा बरी अशी परिस्थिती पाहायला मिळते. मात्र, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात परीस्थिती गंभीर होऊ शकते. रुग्ण संख्या वाढली तर नागपूरमध्ये सर्वाधिक गंभीर परिस्थिती होऊ शकते.

 नियमावलीचे कडक पालन करा

 ही दुसर्‍या लाटेतील परिस्थिती आहे. आणखी तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तीवली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका हा मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतोय. यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त लसीकरण करणं हा एक आहे. मात्र, वाढत्या लसीचा तुटवडा लक्षात घेता सर्वांचं लसीकरण करणं तेवढं शक्य नाही. परंतु, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली तर कोरोनाचा वाढता संसर्ग कमी होऊ शकतो आणि भविष्यातील हा मोठा धोका टळू शकतो

  लॉकडाऊनला विरोध

  देशात करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी द लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सने केंद्र सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. टास्क फोर्सने संपूर्ण लॉकडाउनला विरोध केला आहे. संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव पर्याय नसून अनेक गोष्टी करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. योग्य ठिकाणी लक्ष्य देत आणि समनव्य साधत परिस्थितीला हाताळणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं आहे. उचलण्यात येणारी पावलं स्थानिक स्थितीच्या आधारे वेगळी असू शकतात. ज्या ठिकाणी संसर्ग वेगाने पसरत आहे तिथे अनेक निर्बंध आणावे लागतील. तर जिथे संख्या कमी आहे तिथे कदाचित योग्य निर्बंध असतील, असं टास्क फोर्सने म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top