मुंबई
मुंबई, प्रतिनिधी
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणार्या भंडार्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 9 जानेवारी रोजी रुग्णालायत नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार आहे.
भंडारा रुग्णालयातील आगीनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात असून, त्यांनी अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे. तसंच रुग्णालयात स्टाफ कमी होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे या घटनेबाबत रुग्णालयातील कर्मचार्यांकडे बोट दाखवण्यात आलं आहे.