नवी मुंबई

 राज्याचा आवडता सण गणेशोत्सव जवळ येतोय. नवी मुंबईत देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या गावी जाता येणार नसल्याने आपल्या घरीच अनेकजण गणेशाची स्थापना करण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या विसर्जनावेळी होणार असून त्यामुळे, भक्तांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने प्रत्येक विभागात वॉर्डानिहाय कृत्रिम तलाव तयार करावेत त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होऊन, पालिकेवरचा व पोलिसांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच गर्दीतून वाढणाराआ संसर्ग एवखणे पालिकेला शकय होणार आहे. तसेच तलावातील पाणी स्वच्छ राहून पालिकेचा गाळ काढण्याकरिता लागणारा पैसा देखील वाचेल. त्यामुळे याबाबत गंभीर्याने घेऊन वॉर्डनिहाय कृत्रिम तलाव तयार करावेत अशी मागणी भाजपाच्या युवती मोर्चा अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी आयुक्तांकडे केली आहे.

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही