आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अखेरीस अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. रविवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली, ज्यात ही घोषणा करण्यात आली. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याचसोबत यंदाच्या स्पर्धेत सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला असून सर्व सामने हे रात्री साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहेत. तसेच ज्या दिवशी डबल हेडर सामने असतील त्या दिवशी दुपारचा सामना हा साडेतीन वाजता सुरु करण्यात येणार आहे.भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर आणि आयपीएलमध्ये समालोचनाचं काम करणारा आकाश चोप्रा याने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यापुढेही हाच निर्णय कायम ठेवा अशी मागणी आकाशने केली आहे.

 

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद