Wednesday, December 02, 2020 | 11:41 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

महाआवास अभियानातून 8 लाख घरांची निर्मिती
मुंबई
21-Nov-2020 04:45 PM

मुंबई

ग्रामीण भागातील गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात 8 लाख 82 हजार घरे बांधण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील बेघरांसाठी महाआवास अभियान महत्वपूर्ण ठरेल असा विश्‍वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील ग्रामीण भागात आजपासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत महाआवास अभियान राबविले जाणार आहे. याअंतर्गत विविध घरकुल योजनांमधून 8 लाख 82 हजार 135 घरपुले बांधण्याची योजना आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ही घरे बांधताना पक्की व मजबूत बांधा. इतर राज्यातील लोकांनी येऊन ही घरे बघावी अशा प्रकारच्या आदर्श व सुंदर घरांची निर्मिती करावी. ही योजना निश्‍चितच यशस्वी ठरेल. ग्रामीण घरकुलांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण) गृहनिर्माण कार्यालयाचा लोगो, अभियानाचे माहितीपत्रक, मार्गदर्शक पुस्तिका, अभियानाचे भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top