राज्यात गेल्या 24 तासांत 19,476 रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या राज्यभरात 2 लाख 73 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत करोनामुळे 33,886 जणांचा मृत्यू झाला आहे.  दिवसभरात देशात 1085 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 90 हजारांवर पोहोचली आहे.आतापर्यंत 45 लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हे प्रमाण 81.25 टक्के आहे.राज्यात गेल्या 24 तासांत 479 करोना रुग्णांचा मृत्यू झाला. याच कालावधीत राज्यभरात 21 हजार नवे रुग्ण आढळले.दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 83 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 56 लाख 46 हजार 10 इतकी झाली आहे.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त