महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 230 करोनाबाधित रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या 4 लाख 22 हजार 118 वर पोहोचली आहे. तर 265 जणांचा मृत्यू झाला असून मृतसंख्या 14 हजार 994 इतकी झाली आहे. दिवसभरात 7543 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 2 लाख 56 हजार 158 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घऱी पाठवण्यात आलं आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 60.68 टक्के आहे. तर मृत्यूदर 3.55 टक्के आहे. आतापर्यंत 21 लाख 30 हजार 98 चाचण्या करण्यात आल्या असून यामधील 4 लाख 22 हजार 118 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन