Tuesday, April 13, 2021 | 01:05 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मिनी लॉकडाऊनमुळे शेअर बाजार कोसळला
मुंबई
05-Apr-2021 09:06 PM

मुंबई

 

 । मुंबई  । प्रतिनिधी ।

 मिनीलॉकडाउनचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारावर उमटले.  बाजारात झालेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्समध्ये तब्बल 1100 अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 300 अंकांनी घसरला. या पडझडीने गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटीचे नुकसान झाले आहे.सध्या सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरु आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखांवर गेला आहे. रविवारी महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने विकेंड लॉकडाउन घोषित केला आहे. दैनंदिन रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. तसेच राजस्थान, कर्नाटक या राज्यामध्ये करोना झपाट्याने फैलावत आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउनचे संकट गडद बनले असून औद्योगिक क्षेत्र धास्तावले आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top