Monday, January 18, 2021 | 04:53 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

लस वाटपातही केंद्राचा आखडता हात
मुंबई
13-Jan-2021 08:23 PM

मुंबई

। मुंबई ।  प्रतिनिधी । 

 कोरोनाचा देशातील सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात असताना लस वितरणात मात्र केंद्र सरकारनं आखडता हात घेतल्याचे मिळालेल्या डोसच्या संख्येवरुन दिसून येते. राज्याला 15 लाख 72 हजार डोस मिळणं अपेक्षित होतं. पण, प्रत्यक्षात राज्याला केवळ 9 लाख 63 हजार लसींचा डोस मिळाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 511 ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर सुमारे 8 लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात 3 हजार 135 शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आल्याची खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे.सुरुवातीस 511 लसीकरण केंद्रांची सोय करण्यात आली होती, परंतु, केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या 350 पर्यंत कमी करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top