Friday, March 05, 2021 | 07:02 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कंगनाचं तोंड सुटलं...पण ट्विटरने केलं बंद
04-Feb-2021 07:42 PM

नवी दिली । वृत्तसंस्था ।

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सरकार व शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष सुरू असताना हा संघर्ष बुधवारी तीव्र स्वरूपात सोशल मीडियावरही दिसून आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही नामवंतांनी शेतकरी आंदोलनास दिलेल्या पाठिंब्यावर तीव्र टीका काही सेलिब्रिटींनी केली. कंगनानं रोहितवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर ट्विटरने डिलीट केलं असलं तरी, रोहितच्या चाहत्यांकडून तिला ट्रोल करण्यात येत आहे.

ट्विटरने अभिनेत्री कंगना रणौतचे दोन ट्विटस काढून टाकले आहेत. कंगनाच्या या ट्विटसमुळे ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हे ट्विटस हटवण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणार्‍या प्रत्येक सेलिब्रिटी बरोबर कंगनाचा सध्या वाद सुरु आहे. ट्विटरवरुन कंगना अत्यंत जिव्हारी लागणार्‍या शब्दांमध्ये टीका करत आहे.

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारे ट्विट केल्यापासून देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. कंगनाने रिहानासह देशातील सेलिब्रिटींवरही जोरदार टीका केली. गायक, अभिनेता दिलजीत दोसांझ बरोबरच तिचा वाद चांगला गाजला. दिलजीतला तिने खलिस्तानी म्हटले. शेतकर्‍यांबद्दलही तिने प्रक्षोभक टिप्पणी केली. त्यामुळे अनेक युझर्सनी ट्विटरकडे कंगनाच्या अकाऊंटची तक्रार केली व तिच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी केली.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top