Saturday, March 06, 2021 | 12:18 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सोनू सूदला 'जोर का झटका'
21-Jan-2021 02:33 PM

। मुंबई । वृत्तसंस्था । 

बेकायदेशीर बांधकामप्रकरणी सोनू सूदला न्यायालयानं दणका दिला आहे. मुंबई महापालिकेनं बजावलेल्या पाडकामाच्या नोटीसला सोनूनं अपिलद्वारे आव्हान दिलं होतं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली असून महापालिकेनं केलेली कारवाई योग्य असल्याचं स्पष्ट करत न्यायालयाचं अपिल आणि याचिका फेटाळली आहे.

अभिनेता सोनू सूदने जूहूमधील आपल्या मालकीच्या शक्तिसागर इमारतीत बेकायदा बदल व बांधकामे करुन हॉटेल - लॉजिंग सुरु केल्यानं मुंबई महापालिकेनं सोनूला नोटिस बजावली होती. सोनू सूदनं पालिकेच्या नोटिसीला अव्हान देत हायकोर्टात धाव घेतली होत. परंतु, आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं सोनू सूदची याचिका फेटाळली आहे. त्यामुळं सोनूच्या इमारतीतील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा मुंबई महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सोनूच्या अर्जावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. कायदा हा फक्त प्रामाणिक, मेहनती व कर्तव्यदक्ष व्यक्तींच्या मदतीला येतो. या प्रकरणात तसे दिसत नाही. त्यामुळे अपिलकर्त्याला कोणताही दिलासा देऊ शकत नाही. आता चेंडू मुंबई महापालिकेच्या कोर्टात आहे, असे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निरीक्षण नोंदवले आहे.

सोनुचं म्हणणं

शक्तीसागर इमारत ही 1992पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत 2018-19मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा 1992पासून तोडण्यात आलेली नाही, असंही सोनू सूदनं न्यायालयात म्हणणं मांडलं होतं.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top