Tuesday, January 26, 2021 | 08:55 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

'या' बॉलीवूड अभिनेत्रीने दिला पुन्हा चर्चेचा विषय
16-Dec-2020 01:02 PM

मुंबई । वृत्तसंस्था ।

कंगणा आणि ऋतिकमधली भांडणं काही काळ शांत झाली होती. मात्र आता त्यावर पुन्हा जोरदार चर्चा सोशल मीडियातून होत आहे. त्यावर दोघेही माघार घ्यायला तयार नाही. कंगणा व्टिट करुन ऋतिकला आणखी डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. काल तिनं त्याच्याविषयी अपमानकारक व्टिट केले आहे. त्यावर आता कंगणाचं प्रकरणाचा शेवट करण्याचा निर्धार ऋतिकनं केला आहे.

कंगणा बदनामी करत असल्यानं कायद्याच्या आधारे तिला धडा शिकविण्यासाठी शेवटपर्यत लढत राहणार असेही ऋतिकनं सांगितले आहे. गेल्या चार वर्षांपासून ऋतिक आणि कंगणा यांच्यात वाद सुरू आहे. सुरुवातीला एकमेकांच्या प्रेमात असणारे हे दोघेजण काही काळानं एकमेकांना सोशल मीडियावर अपशब्द वापरु लागल्याचे दिसून आले आहे. त्यानं त्या दोघांच्या चाहत्यांमध्येही नाराजी दिसून आली. या प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लागावा यासाठी ऋतिकनं तयारी सुरु केली आहे. ऋतिकच्या वकिलांनी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता हा तपास गुन्हे शाखा करणार आहे.

याबाबत स्पॉटबॉयला ऋतिकच्या एका जवळच्या नातेवाईकानं माहिती दिली. त्यानं असे सांगितले की. ऋतिकला असे वाटते की, लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लागावे आणि त्यातून आपल्याला दिलासा मिळावा. ऋतिकनं काही करुन या प्रकरणाचा निकाल लागावा यासाठी तयारी सुरु केली आहे. आपली मोठ्या प्रमाणात मानहानी झाली आहे. ती आणखी होऊ नये आणि आपल्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळावी असा प्रयत्न ऋतिकचा आहे.

कंगणानं केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण तयारी ऋतिकनं केली आहे. गेल्या काही वर्षात कंगणामुळे अनेक प्रकारच्या मानहानीला तोंड द्यावे लागले आहे. 2016 मधला त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याविषयी ऋतिकनं सांगितले की, कंगणाचं पुन्हा रडणं सुरु झालं आहे. आमच्या ब्रेक अपला खूप वर्षे झाली आहेत. आणि माझ्या घटस्फोटालाही बराच काळ लोटला आहे. आता त्यावरुन का चर्चा केली जात आहे हे मला माहिती नाही. मी आता कुणाबरोबरही डेट करत नाही. कुणालाही भेटायला जात नाही. ज्यावेळी मी माझ्या ताकदीवर पुन्हा एकदा आयुष्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत असताना कंगणानं पुन्हा एकदा नाटकं सुरु केलं आहे. 

’कब तक रोएगा एक छोटेसे अफेअर के लिए’

कंगना केलेल्या पोस्टमध्ये ॠतिक रोशनला ’कब तक रोएगा एक छोटेसे अफेअर के लिए’ असे म्हंटले आहे. यावर एका मुलाखतीत ऋतिकनं सांगितले होते की, मला माझ्या जबाबदारीचे भान आहे. आज माझ्या सोबत जे काही झाले आहे ते आणखी कुणाच्याही बाबत होऊ शकते हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं. मात्र याप्रकरणातील सत्य बाहेर आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माझ्याविषयी चाहत्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा गैरसमज मला ठेवायचा नाहीये. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top